loader
Breaking News
Breaking News
Foto

शिशुवर्गाच्या बालकांनी केला प्रभु रामचंद्रचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित शिशुविहार, चिपळूण येथे बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी रामनवमी हा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विभाग प्रमुख श्रुती रानडे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “श्रीराम जय राम जय जय राम” या गजराने वातावरण भारावून टाकले. तसेच कार्यक्रमात भजन व कीर्तनाचे सादरीकरण करण्यात आले. आदिती फडणीस यांनी श्रीरामाची संपूर्ण कथा विद्यार्थ्यांना सांगितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रामजन्माचा सोहळा साजरा करताना पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पाळणा गात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे आनंद व्यक्त केला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले. लहानगे विद्यार्थी राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी मानसी नाटुस्कर यांनी विद्यार्थ्यांना रामनवमी सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन, त्यांची कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबाबत श्रुती रानडे यांनी मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला शाळेच्या विभाग प्रमुख, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर निर्माण होतो. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg