loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली येथील परिचारिका/नर्स मारहाण प्रकरण.. आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खेड (प्रतिनिधी) - दापोली येथील संशयित ओमकार विलास कोळेकर व संख्या गुरुप्रसाद कोळेकर, साहिल गुरुप्रसाद कोळेकर यांच्याविरुद्ध दापोली पोलिसांनी पारिचारिका यांच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दापोली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दापोली पोलीस स्टेशन येथे आंदोलन देखील करण्यात आले होते. तसेच कलेक्टर यांच्याकडे काम बंद करू वगैरे निवेदन दिली होती, सदर प्रकरणी आरोपी यांच्यातर्फे एडवोकेट समीर शरद शेठ यांनी जिल्हा न्यायालय खेड यांच्याकडे अटकपूर्व जामीन मिळण्याचा अर्ज केला होता. सदर जामिनाची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. एडवोकेट समीर शरद शेठ यांनी या कामी युक्तिवाद करून उच्च न्यायालयाचे खटले देखील हजर केले. सदर निकाल ग्राह्य धरून व ऍडव्होकेट समीर शरद शेठ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर संशयित आरोपी ओमकार कोळेकर व संख्या कोळेकर यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg