देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख / संगमेश्वर / साखरपा परिसरातील व्यापाऱ्यांसाठी क्रांती व्यापारी संघटनेचे आवाहन. अन्न व औषधे प्रशासन (FDA) कडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार अन्न व्यवसायाशी संबंधित सर्व आस्थापनांसाठी FOSTAC (Food Safety Training and Certification) प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर क्रांती व्यापारी संघटनेतर्फे संगमेश्वर तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना तातडीचे आवाहन करण्यात आले आहे.या प्रशिक्षणामध्ये अन्न सुरक्षितता, स्वच्छता, गुणवत्ता नियंत्रण तसेच शासनाच्या नियमांचे पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे, शासन आयोजित हे प्रशिक्षण मोफत उपलब्ध असून, त्याचे प्रमाणपत्र अन्न व औषध (अन्न भेसळ) परवान्याइतकेच महत्त्वाचे मानले जात आहे. संबंधित प्रमाणपत्र नसल्यास भविष्यात कारवाई होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. खासगी पद्धतीने हेच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो, त्यामुळे शासनाच्या या संधीचा लाभ घेणे गरजेचे आहे. दरम्यान, हे प्रशिक्षण शिबिर दि. 27 मार्च 2026 रोजी लांजा येथे आयोजित करण्यात आले असून, क्रांती व्यापारी संघटनेतर्फे सहभागी होण्यासाठी जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुक व्यापाऱ्यांनी तात्काळ आपली नावे संघटनेकडे नोंदवावीत, जेणेकरून ये-जा व्यवस्थेची सोय करता येईल. इच्छुक व्यापारी वैयक्तिकरित्या देखील प्रशिक्षणासाठी उपस्थित राहू शकतात.
या प्रशिक्षणासाठी किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, बेकरी चालक, स्ट्रीट फूड विक्रेते, पानपट्टी, जनरल स्टोअर्स तसेच चिकन-मटण विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. “सुरक्षित अन्न – सुरक्षित ग्राहक – मजबूत व्यवसाय” या उद्दिष्टाने सर्व व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे क्रांती व्यापारी संघटनेने स्पष्ट केले आहे. सम्पर्क साठी निखिल कोळवणकर - 9420907388, नितीन हेगशेट्ये - 9422382203, संदीप वेल्हाळ - 9421136725






























































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.