loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात काही भागांना पावसाचा ‘यलो अलर्ट’, तर उष्णतेच्या लाटेचाही अलर्ट

मुंबई.- राज्यात मागील काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा प्रभाव सर्वसामान्य नागरिकवर जाणवत आहे. अनेक भागांत अधूनमधून पावसाची नोंद होत आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशातच हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांसाठी राज्यातील काही भागांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वातावरणातील आर्द्रता आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे ढगाळ वातावरण तयार होत असून, अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकण किनारपट्टीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या भागांत उष्ण आणि दमट हवामान कायम असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उत्तर कोकणातही पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, तापमानातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. पुढील तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात 1 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. त्यामुळे उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील अकोला येथे नोंदविण्यात आले. येथे तापमानाचा पारा 40.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता, ज्यामुळे उष्णतेची तीव्रता स्पष्ट झाली आहे. राज्यात सध्या ‘उष्णता आणि पावसाचा संगम’ पाहायला मिळत असून, नागरिकांनी हवामानातील या बदलांचा विचार करून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg