loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचनदीत रंगणार 'अमृत महोत्सवी' हनुमान जन्मोत्सव! दोन दिवस कार्यक्रमांची मांदियाळी

दापोली (सागर गोवळे) - श्री हनुमान स्नेहवर्धक मंडळ, हनुमानवाडी पंचनदी यांच्या वतीने यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून 'अमृत महोत्सव - २०२६' अत्यंत दिमाखात साजरा केला जाणार आहे. बुधवार, १ एप्रिल आणि गुरुवार, २ एप्रिल रोजी होणाऱ्या या सोहळ्यात धार्मिक विधींसोबतच मनोरंजनाची मेजवानी आणि भव्य 'लकी ड्रॉ'चे आकर्षण असणार आहे. ​कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, १ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता भव्य 'शोभायात्रेने' होईल. दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी बच्चेकंपनीसाठी 'फनी गेम्स'चे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता 'कला कुंभ' हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहाटे ६:२० वाजता: श्री हनुमान जन्मकाळ सोहळा. ​सकाळी ११:०० वाजता: श्री सत्यनारायणाची महापूजा. ​दुपारी १:०० ते ३:००: भव्य महाप्रसाद. ​सायंकाळी ४:०० ते ६:००: महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ. ​रात्री १०:०० वाजता: 'देवापुढे माणूस?' हे खास नाटक सादर होईल. ​अमृत महोत्सवी 'लकी ड्रॉ' - जिंका पैठणी आणि स्मार्ट वॉच! ​या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे फक्त १०० रुपयांच्या कुपनवर मिळणारे भरघोस बक्षीस. लकी ड्रॉमध्ये शाही पैठणी, चांदीचे पैंजण, स्मार्ट वॉच, टेबल फॅन, कुलर फॅन आणि मिक्सर ग्राइंडर यांसारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. या ड्रॉचा निकाल २ एप्रिल रोजी रात्री ९:१५ वाजता हनुमान मंदिर येथे जाहीर केला जाईल. ​"मराठी संस्कृती जपणारा महासोहळा" असे ब्रीदवाक्य घेऊन साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री हनुमान स्नेहवर्धक मंडळ, पंचनदी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg