loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्याच्या विकास आराखड्यात ९५ टक्के बदल

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायतीच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये लोकांच्या हरकतीनुसार ९५ टक्के बदल करण्यात आलेला असून त्यामध्ये एकही घर वा गोठा बाधीत होणार नाही. अशी माहिती लांजा नगरपंचायतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. लांजा नगरपंचायतीच्या वतीने नुकताच शहराचा सुधारित विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यावर लांजा-कुवे बचाव समितीने जोरदार आक्षेप घेत आराखडा रद्द करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज लांजा नगरपंचायतच्या वतीने बुधवार दिनांक २५ मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आले की, लांजा नगरपंचायतीच्या वतीने नुकत्याच जाहीर करण्यात आलेला या सुधारित विकास आराखड्यामध्ये लोकांच्या हरकतीनुसार ९५ टक्के बदल करण्यात आलेला आहे. एकूण नऊ मीटरचे १५ रस्ते रद्द करण्यात आले आहेत. १२ मीटरचे पाच रस्ते रद्द करून ते नऊ मीटर करण्यात आले आहेत. १८ मीटरच्या ९ रस्त्यांपैकी रिंग रोड सहीत काही रस्ते रद्द करण्यात आले आहेत. काही रस्ते कमी करण्यात आले आहेत. याचबरोबर या सुधारित विकास आराखड्यामध्ये अनेक लोकांच्या मागणीनुसार अनेक ठिकाणचे नो डेव्हलपमेंट झोन आणि ग्रीन झोन हे काढून टाकण्यात आले असून त्या ठिकाणी रेसेडन्सियल म्हणजे निवासी झोन करण्यात आले आहेत.

टाइम्स स्पेशल

यापूर्वी कुवे गावच्या दोन्ही साईडला कुवे हद्दी पर्यंत नो डेव्हलपमेंट झोन टाकण्यात आला होता. हा झोन काढून टाकण्यात आला असून रहिवासी झोन करण्यात आला आहे. नकाशामध्ये करण्यात आलेला बदल हा निळ्या बॉर्डरने दाखवण्यात आला आहे. आलेल्या पंधराशे हरकती नुसार ९५ टक्के बदल झालेला आहे. सुधारित विकास आराखडा संदर्भात ज्या नागरिकांना आपल्या हरकती घ्यायच्या आहेत त्यांनी या हरकती नगर रचनाकार विभाग पुणे तसेच नगर रचनाकार विभाग प्रधान सचिव मंत्रालय मुंबई या ठिकाणी दाखल करायचे आहेत. परंतु नागरिकांच्या गैरसोयीचे दृष्टीने या हरकती लांजा नगरपंचायत याच ठिकाणी घेण्यात याव्यात या दृष्टीने लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, आणि नगररचना सहाय्यक सुचेत बन्ने हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg