रत्नागिरी : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधेर्ये वाढविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरावरुन पदक बहाल करुन गौरविण्यात येते. विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सन 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्ण पदक तर वनरक्षक अरविंद मांडवकर यांना रजत पदक जाहीर करण्यात आले आहे.
महसूल व वन विभागाने काल 25 मार्च रोजी याबाबत शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. देसाई ठाणे वन विभागात कार्यरत असताना 2023 अखेर त्यांनी 30 हून अधिक बिबट्यांची सुटका केली. जवळपास 200 हून अधिक अन्य वन्य प्राण्यांची सुटका केली आहे. अवैध तस्करी प्रकरणी 50 हून अधिक वाहने सरकारी जमा केली आहेत. पडघा येथील त्यांची खैर तस्करी कारवाई मोहीम विशेष गाजली. वन्य प्राणी विशेषत: बिबट्या या विषयी त्यांनी जनजागृती मोहीम राबविली आहे. या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, त्यांना सुवर्ण पदक जाहीर केले आहे.
त्याचबरोबर वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांनाही त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सुवर्ण जाहीर झाले आहे. तसेच वनरक्षक मांडवकर यांना रजत पदक राज्य शासनाने जाहीर केले आहे. लवकरच राज्यस्तरीय पदक निवड समितीच्या शिफारशीनुसार या अधिकाऱ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. या बाबीची नोंद संबंधित विभाग प्रमुख, कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्या सेवापुस्तकात घेण्याबाबतही म्हटले आहे.

































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.