रत्नागिरी: जिल्हा खनिकर्म विभागाला चालू आर्थिक वर्षासाठी ९८ कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे मोठे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हे उद्दिष्ट पूर्ण करणे विभागासाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे दिसत असून, जेमतेम ५० कोटी रुपयांपर्यंतच मजल मारता येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विविध सरकारी प्रकल्पांमधून मिळणाऱ्या रॉयल्टीमध्ये झालेली घट हे यामागील मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याला जलसंपदा विभागाच्या कामांमधून सुमारे ३३ कोटी रुपयांचा मोठा महसूल मिळाला होता. मात्र, यावर्षी चित्र पूर्णपणे वेगळे आहे. जलसंपदा विभागाच्या अनेक कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
प्रशासकीय मान्यता रखडल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही, परिणामी त्यातून मिळणारी रॉयल्टी यावर्षी थांबली आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या एकूण महसूल उत्पन्नावर झाला आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गाची कामे आता पूर्णत्वाकडे आली आहेत. महामार्गासाठी लागणाऱ्या खडी आणि मातीसाठी जी रॉयल्टी मिळत होती, ती काम संपत आल्यामुळे आता बंद झाली आहे. तसेच, अनेक कंत्राटदारांकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने नवीन कामांची गती मंदावली आहे. निधीच्या अभावामुळे विकासकामे रखडली असून, साहजिकच खनिकर्म विभागाला मिळणाऱ्या रॉयल्टीवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.
एकीकडे ९८ कोटींचे लक्ष्य आणि दुसरीकडे रखडलेली कामे अशा कात्रीत खनिकर्म विभाग सापडला आहे. सध्याच्या उपलब्ध स्त्रोतांनुसार जास्तीत जास्त ५० कोटी रुपयांपर्यंत महसूल गोळा होऊ शकतो. उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष जमा होणारा महसूल यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक तफावत राहण्याची शक्यता आहे. प्रशासकीय मान्यता मिळण्यास होणारा विलंब आणि निधीची कमतरता यामुळे जिल्ह्याच्या तिजोरीत पडणाऱ्या या महसुली खड्याने विभागाची चिंता वाढवली आहे.






























































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.