loader
Breaking News
Breaking News
Foto

नाम. योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोलीतील विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

दापोली (प्रतिनिधी) - दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम हे आपल्या दापोली मतदारसंघात कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोलीतील विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा घसघशीत विकास निधी मंजूर करण्यात यशस्वी झाले आहेत. या त्यांच्या महत सामाजिक बांधिलकीच्या कामाचे तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील भुमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देणे त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे या उद्देशाने "कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम" ही योजना राबविण्यात येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या योजनेअंतर्गत दापोली तालुक्यातील पर्यटन दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या गावातील गेली अनेक वर्षे रखडलेल्या विविध विकास कामांना महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी गती दिली असून त्यांच्या प्रयत्नाने दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी ५० लाख रुपये, पालगड जोड रस्ता ग्रामा ३० मध्ये सुधारणा करणे, खडीकरण, डांबरीकरण व काॅक्रीटीकरण व गटार कामे करण्यासाठी १ कोटी रुपये, केळशी ग्रामपंचायत कार्यालय ते महालक्ष्मी मंदिर रस्ता काॅक्रीटीकरण व डांबरीकरण करणे तसेच केळशी गावातर्गत रस्ते डांबरीकरण करणे कामासाठी १ कोटी रुपये तसेच आसुद धनकोडी येथे पुलाचे बांधकाम व संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे या कामासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा विकास निधी अशाप्रकारे २५ मार्च २०२६ रोजी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोलीतील विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा घसघशीत विकास निधी मंजूर झाला आहे. नाम.योगेशदादा कदम यांच्या या दमदार कामगिरीचे दापोलीत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg