loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात 21 जूनला टीईटी परीक्षा

पुणे : राज्यातील शिक्षक भरतीसाठी अत्यावश्यक मानली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2026 येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या परीक्षेनंतर आता पुढील परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना 27 मार्च ते 16 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्ज केवळ इंग्रजी भाषेतच भरावा लागणार आहे. अर्ज सादर करताना उमेदवारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अर्जाची अंतिम मुदत संपल्यानंतर त्यामध्ये कोणतीही दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज भरताना माहिती अचूक भरावी, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ९ जून ते २१ जून या कालावधीत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे लागेल. शिक्षक होण्याची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी असून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करून परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg