सावंतवाडी : सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेगा मल्टिस्पेशालिटी आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किम्स हॉस्पिटल, ठाणे शाखेच्या वतीने विशेष उपकरणांचा वापर करून टू-डी इको पद्धतीद्वारे १८ वर्षांखालील मुलांच्या हृदयविकाराचे निदान व पुढील शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये सावंतवाडी तसेच बांदा, कणकवली, मालवण, शिरोडा या परिसरांतील अनेक बालकांचा सहभाग होता. यावेळी किम्स हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झालेला नऊ वर्षीय झेविअर फर्नांडिस हा आपल्या पालकांसह उपस्थित होता. त्याच्या पालकांनी इतर पालकांना मार्गदर्शन करून सकारात्मक अनुभव शेअर केला.
शिबिरासाठी किम्स हॉस्पिटलचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास एल आणि डॉ. सोनिया कारापूरकर उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वास्थ संकल्प समितीच्या तरुणांनी मागील काही दिवसांपासून अविरत परिश्रम घेतले. समितीच्या सदस्यांनी शिबिर यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, कोकणातील नव्या पिढीसाठी हे शिबिर आशेचा किरण ठरल्याची भावना व्यक्त केली. यावेळी किम्स हॉस्पिटल, ठाणे शाखेच्या डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भविष्यात अशा प्रकारचे आरोग्य शिबिर संपूर्ण कोकणात आयोजित करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्वास्थ संकल्प समिती ही संस्था समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत शस्त्रक्रिया सुविधा पोहोचविणे तसेच विविध सरकारी आरोग्य योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी कार्यरत आहे.


































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.