मुंबई : मुलुंड परिसरातील एलबीएस मार्गावर घडलेल्या मेट्रो-4 मार्गिकेवरील भीषण अपघातासाठी कंत्राटदारच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या चौकशी समितीच्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे. वडाळा-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-4 मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या खांबांवर बसविण्यात आलेला सुमारे अडीच मेट्रिक टन वजनाचा सिमेंटचा पॅरापेट कोसळून हा अपघात झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. चौकशी अहवालानुसार, हा अपघात कोणत्याही डिझाईनमधील त्रुटी किंवा बांधकाम साहित्याच्या कमतरतेमुळे घडलेला नाही. उलट, संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कामाची अंमलबजावणी करताना आवश्यक कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले नाही, तसेच सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे.
या प्रकल्पाचे काम Reliance Infrastructure Limited आणि इटालियन कंपनी Astaldi यांच्या संयुक्त उपक्रम ‘आरएजेव्ही’कडे देण्यात आले आहे. या संयुक्त उपक्रमातील एका वेल्डरने नुकत्याच बसवलेल्या सिमेंट पॅरापेटचा तात्पुरता आधार जोडणी पूर्ण होण्यापूर्वीच काढून टाकल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवण्यात आला आहे. समितीने पुढे नमूद केले आहे की, या भागातील संरचनात्मक कामात कोणतीही कमतरता, दोष किंवा कारागिरीतील त्रुटी आढळून आलेली नाही. मात्र, पर्यवेक्षणाचा अभाव, असुरक्षित कार्यपद्धती आणि नियमांचे उल्लंघन यामुळेच हा अपघात घडला. या निष्कर्षामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रकल्पांमध्ये अधिक कडक सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.