loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि कोकण रल्वे प्रशासनाकडे जाहीर मागणी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - दादर रत्नागिरी आणि सी एस टी मुंबई ते सावंतवाडी या दोन्ही ट्रेन रेल्वे मंत्रालय आणि कोकण रेल्वे प्रशासनाने 30 एप्रील पर्यंत चालू कराव्यात अन्यथा रेल रोको आंदोलन करणार असा इशारा अशोकराव जाधव संस्थापक अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य आणि माजी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यानी दिला आहे. या बाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की केंद्रातील आत्ताचे सरकार आणि महाराष्ट्रातील भाजपा, सेनेचे युती सरकार सातत्याने कोकणावर अन्याय करत असून सर्व कोकणातील नागरिकांच्या सयंमाचा अंत पहात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणात विष तयार करणारे नागरिकांच्या आरोग्यास बाधा आणनारे केमिकल फॅक्टरी आणून वातावरण प्रदुषीत करणारे, शेती, फळबागा, मच्छीमारी नष्ट करणारी धोरणे राबवित आहे. त्यातच कोकणी जनतेची अर्थ वाहिनी असणार्‍या मुंबई, ठाणे महानगरांशी संबध तोडण्यासाठी रेल्वे बंदचे हत्यार केंद्र व राज्य सरकारने ऊपसले आहे. कोकणी जनतेने विषेशः म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हातील सर्वच जनतेने हे समजून घेतले पाहिजे आणि रेल रोको आंदोलन काँग्रेस आणि शेतकरी - कष्टकरी संघटनेच्या वतिने पुढाकाराने होत असले तरी रेल रोको आंदोलनात पक्षभेद, मनभेद, जाती, समाज, धर्म भेद बाजूला ठेवून सर्व नागरिकानी कोकणच्या भल्यासाठी सामील झाले पाहिजे, असे कळकळीचे आवाहन अशोकराव जाधव यानी केले आहे.

टाइम्स स्पेशल

या बाबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, सहकारी संस्था, बँका, सर्व राजकिय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, ग्राम मंडळे, लोकप्रतिनिधी यानी कोकण रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला दादर - रत्नागिरी आणि सी एस टी सावंतवाडी या दोन ट्रेन सर्व स्टेशनवर थांबणाऱ्या चालू कराव्यात. असे ठराव करून पाठवावेत हे सर्व ठराव 20 एप्रील पर्यंत केंद्रीय रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली आणि कोकण रेल्वे प्रशासन नवी मुंबई येथे पाठवावेत आणि आपआपल्या स्थरावर या दोन्ही ट्रेन चालू करणेबाबत वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल, सोशल मिडीया आणि तालुक्यातील, तहसिलदार, प्रांत, जिल्हा अधिकारी यांचेकडे ही निवेदन देण्यात यावे, असे आवाहन अशोकराव जाधव यांनी यावेळी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg