loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात १९ रोजी कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालय येथे दि.१९ डिसेंबरला कर्क रोग तपासणी व जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅनच्या साहाय्याने मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांची तपासणी केली जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि प्राथमिक अवस्थेतच रोग निदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्करोगाची काही प्रमुख लक्षणे यात मुख कर्करोग २ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंडात व्रण (जखमा) असणे. तोंडांमध्ये लाल किंवा पांढरा चट्टा दिसून येणे. तोंड उघडण्यास त्रास होणे. स्तन कर्करोग यात स्तनामध्ये गाठ जाणवणे. स्तनाच्या आकारात बदल होणे. स्तनग्रंथीतून पू किंवा रक्तस्त्राव होणे. गर्भाशय मुख कर्करोग यात मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव होणे. मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होणे. शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे. योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.

टाइम्स स्पेशल

या विशेष मोहिमेसाठी कर्करोग मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे. या व्हॅनमध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्राथमिक अवस्थेतच आपला आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय, मालवण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg