loader
Breaking News
Breaking News
Foto

पेट्रोल डिझेल मिळणार नाही या अफवेने दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंपावर अफाट गर्दी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - आखाती देशात सुरू असलेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा तसेच पेट्रोल, डिझेल, इंजिन बाबत मोठया प्रमाणात राज्यात तसेच देशात अफवा पसरवली जात आहे. कोणत्याही प्रकारची पेट्रोल डिझेल टंचाई नाही असे आवाहन राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी करत आहेत. शिवाय गोवा राज्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाहन धारकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, गोवा राज्यात साठा उपलब्ध आहे असे सांगितले. असे असताना गोवा राज्यात दोन दिवस पुरणार एवढा साठा उपलब्ध आहे. अशी पुडी सोडली आणि पेट्रोल व डिझेल, यासाठी दोडामार्ग गोवा सीमेवर असलेल्या पेट्रोल पंपावर मोठया प्रमाणात गर्दी झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे कामगार देखील हैराण झाले आहेत. रांगा लागत असल्याने कर्मचारी यांना उशिरापर्यंत थांबावे लागत आहे. दोडामार्ग गोवा सीमेवर दोन पेट्रोल पंप आहेत. गोवा राज्यात पेट्रोल डिझेल दर कमी आहेत याचा फायदा दोडामार्ग तालुक्यातील तसेच गोवा येथील वाहन धारकांना मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पासून पेट्रोल पंपावर फारशी गर्दी नव्हती. सुरळीत पेट्रोल मिळत होते. गेल्या दोन तीन दिवसात गोवा राज्यात फक्त दोन दिवस पुरेल एवढे पेट्रोल व डिझेल साठा उपलब्ध आहे अशी पुडी सोडली आणि दोन्ही पंपावर वाहन धारकांची गर्दी झाली. पेट्रोल पंप राञी १० ते ११ वाजता बंद केले जातात. पण वाहन धारकांच्या रांगांमुळे राञी १२ ते १२.३० पर्यंत दोडामार्ग गोवा सीमेवर पेट्रोल पंप सुरू ठेवावे लागत आहेत, यामुळे कामगार हैराण झाले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg