loader
Breaking News
Breaking News
Foto

गहाळ झालेले १०० मोबाईल तळोजा पोलिसांकडून मूळ मालकांना सुपूर्द

पनवेल :- CEIR पोर्टलचा वापर करून 16 लाख 37 हजार रुपये किंमतीचे 100 मिसिंग मोबाईल तळोजा पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत. वरिष्ठांनी CEIR पोर्टलचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील मिसिंग मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तळोजा पोलीस ठाण्यात 01/06/2025 ते 24/03/2026 दरम्यान विशेष मोहीम राबवून 16 लाख 37 हजार रुपये किमतीचे 100 मिसिंग मोबाईल हस्तगत केले असून तक्रारदार यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले आहेत. सदरची कामगीरी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे, पोलीस शिपाई सचिन माने, पोहवा शंकर शिंदे, अजय मढवी, पोहवा दिपक सावंत, गुरुनाथ भुंडेरे, पोशी राजेश उगाडे गुन्हे प्रकटिकरण अंमलदार यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg