loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वीफ्ट गाडीने घेतला अचानक पेट

पनवेल - शहराजवळील गार्डन हॉटेल सिग्नलजवळ चालत्या स्वीफ्ट गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी उशिराने सायन - पनवेल मार्गावर घडली असून सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पनवेल शहराजवळील गार्डन हॉटेल सिग्नल जवळ बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. 2024 चे मॉडेल असलेल्या चालत्या स्वीफ्ट गाडीने अचानकपणे पेट घेतला. त्यामुळे परिसरात काहीकाळ एकच खळबळ उडाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पनवेल शहर पोलीस ठाणे तसेच अग्नीशमन दलाला देताच अग्नीशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी रवाना होवून त्यांनी सदर आग अथक परिश्रम करून आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर गाडी ही सीएनजी प्रकारची असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg