loader
Breaking News
Breaking News
Foto

नाधवडे गावठण येथे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) - नाधवडे गावठण येथील श्री चवाटीमाता आणि श्री विठ्ठलादेवीमाता मंदिराच्या जिर्णोद्वार सोहळा १ ते ३ मे या कालावधीत होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा, सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रारंभशुक्रवार (ता.१) मे रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी ८.३० वाजता कलश स्थापना, यज्ञ, ग्रामस्थांचे नवसविधी ठेवून आमंत्रण संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्यवरण, स्थापत्य विधान, यज्ञारंभ, कलशस्थापना तसेच आवाहित देवतांचे ग्रहशांती विधी पार पडणार आहेत. रात्री ८ वाजता सुस्वर भजनांचा कार्यक्रम होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुस-या दिवशी शनिवार (२ मे) सकाळी ८ वाजता वास्तुग्रह देवतांची स्थापना, पूजन व हवन, मुख्य देवतांचे प्रतिष्ठा होम, वास्तुहोम व ग्रहहोम होणार आहेत. सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत कलशासह प्रदक्षिणा काढण्यात येणार असून रात्री १० वाजता मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (३ मे) सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री महासंस्थान सिद्धगिरी मठ कोल्हापूर चे स्वामी चिदानंद यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर आरती, सर्व देवतांचा मंत्रोपचाराने होम, नेत्रोन्मीलन, देवतांची प्राणप्रतिष्ठा, तांब्या धातूचा कलश प्रतिष्ठापना, मुख्य देवतांची महापूजा, पूर्णाहुती, अभिषेक, महाअभिषेक, नैवेद्य, महाआरती, प्रार्थना, प्रसाद व महा-प्रसादाचे वाटप होईल. रात्री १० वाजता "भक्ती ते ताल" हा देवधून सुस्वर मैफल कार्यक्रम रंगणार आहे. या सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन बारा-पाच मानकरी, सेवेकरी, समस्त ग्रामस्थ तसेच नाधवडे ग्रामविकास मंडळ मुंबई यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg