loader
Breaking News
Breaking News
Foto

रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २६ एप्रिलला मुंबईत 'महाराष्ट्र रेल्वे परिषद'

सावंतवाडी: कोकण रेल्वेसह राज्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, रद्द करण्यात आलेल्या गाड्या आणि रखडलेले प्रकल्प यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या रविवारी, २६ एप्रिल रोजी मुंबईत 'महाराष्ट्र रेल्वे परिषद' आयोजित करण्यात आली आहे. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात सकाळी १० वाजता ही परिषद पार पडणार आहे. ​दरवर्षी सणासुदीला गावी जाताना चाकरमान्यांचे होणारे हाल, तिकीट असूनही करावा लागणारा असुरक्षित प्रवास आणि 'शून्य आधारित वेळापत्रका'मुळे रद्द झालेल्या गाड्यांमुळे प्रवाशांमध्ये मोठा असंतोष आहे. विशेषतः सावंतवाडी टर्मिनससारखे महत्त्वाचे प्रकल्प अनेक वर्षे पूर्ण न झाल्याने कोकणवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाला जाब विचारण्यासाठी हा लढा उभारण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही राजकीय संघटना याचे नेतृत्व करत नसून, सामान्य रेल्वे प्रवासीच याचे आयोजक आहेत. "आपल्या हक्काच्या गाड्या आणि टर्मिनससाठीचा हा लढा आपल्यालाच लढावा लागेल," अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे. ​या मोहिमेचा भाग म्हणून प्रत्येक प्रवाशाने आपल्या भागातील आमदार आणि खासदारांना प्रत्यक्ष भेटून परिषदेचे निमंत्रण देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींना प्रवाशांच्या समस्यांची जाणीव करून देणे आणि प्रलंबित मागण्या मार्गी लावणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेला जास्तीत जास्त रेल्वे प्रवाशांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg