loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुहागर येथे विविध शिबिरांचे आयोजन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयुष्मान भारत मार्गदर्शन शिबिर आणि आभा कार्ड नोंदणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात उद्या गुहागर येथून होत आहे. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल,शृंगारतळी येथे सकाळी १०.०० वाजता या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते आणि मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष हे केवळ एक वर्ष नसून, खऱ्या शिवसैनिकांसाठी हा एक उत्सव आहे आणि हा उत्सव खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी साजरा झाला पाहिजे, याच भावनेतून जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन केले आहे. शृंगारतळी येथे होणाऱ्या या शिबिराचा लाभ तालुक्यातील सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. अशाच प्रकारे दि. २७ एप्रिल २०२६ रोजी चैतन्य मंगल कार्यालय रामपूर (चिपळूण) येथे सकाळी १०.०० वाजता आणि २८ एप्रिल २०२६ रोजी क्षुधाशांती हॉटेल, लोटे MIDC रोड, खेड येथे सकाळी १०.०० वाजता अशा प्रकारे ही शिबिरे होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg