loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणाच्या खनिजावर कंपन्यांचा डोळा

रत्नागिरी, ता. २३ : कोकणाच्या खनिजावर बाहेरच्या मोठ्या कंपन्यांचा डोळा आहे. कोकणच्या भूगर्भातील खनिज संपत्तीचा उपसा येत्या काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रमुख कंपन्यांना बॉक्साईट उत्खननासाठी दीर्घकालीन खाणपट्टे मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये मंडणगड, दापोली आणि राजापूर या तालुक्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश खाणपट्ट्यांची मुदत आगामी पाच दशकांपपर्यंत म्हणजेच २०५५ ते २०६० पर्यंत असणार आहे. विविध कंपन्यांकडुन तब्बल साडे 400 हेक्टर बॉक्साईट उत्खनन होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​​जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंडणगड तालुक्यातील गुढेघर येथे 'मे. इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक' या कंपनीला ९१.५८ हेक्टर क्षेत्रावर बॉक्साईट उत्खननासाठी मंजुरी मिळाली आहे. या खाणपट्ट्याची मुदत २६ ऑगस्ट २०६० पर्यंत आहे. ​दापोली तालुक्यात खनिज उत्खननाचा मोठा आवाका दिसून येत असून, येथे 'मे. आशापुरा माईनकेम लिमिटेड' या कंपनीला दोन मोठ्या प्रकल्पांसाठी मंजुरी मिळाली आहे. मौजे रोवले येथील २१८.२८ हेक्टर आणि मौजे उंबरशेत येथील ९९.८६ हेक्टर अशा विस्तीर्ण क्षेत्रावर बॉक्साईटचे उत्खनन केले जाणार आहे. या दोन्ही खाणपट्ट्यांची मुदत २०५५ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

दक्षिण रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातही नाणार आणि हमदरा घोडकेवाडा परिसरात खाणकामाचे नियोजन आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, हमदारा-वाडा परिसरातही मोठ्या क्षेत्रावर खनिजाचे साठे आहेत. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या खाणपट्ट्यांचे एकूण क्षेत्रफळ आणि कालावधी पाहता, खनिजावर आधारित उद्योगांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. राजापूर तालुक्याचा विचार करता ६७३.७२ हेक्टर बॉक्साईडचे उत्खनन होणार आहे. ​या खाणपट्ट्यांमुळे राज्य शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. मात्र, हे उत्खनन करताना पर्यावरणाचे नियम पाळले जावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या मंजूर असलेले खाणपट्टे हे पुढील ५० वर्षांच्या दृष्टीने नियोजित असल्याने रत्नागिरीच्या खनिज नकाशावर दापोली आणि मंडणगड हे तालुके केंद्रस्थानी आले आहेत. राजापूर तालुक्यातील नाणार आणि हमदारा घोडके वाडा येथील जन सुनावणीला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. स्थनिकांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेत उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी देखील या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. जिल्ह्यात जवळपास राजापूर तालुक्याचा विचार करता 673.72 हेक्टर मध्ये बॉक्साइडचे उत्खनन होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg