loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथे ‘माझ गांव आरोग्य संपन्न गांव’ कार्यशाळेचा शुभारंभ

लांजा (सिराज नेवरेकर) - माझं गांव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ पंचायत समिती लांजा सभापती सौ.मानसी आंबेकर यांचे शुभहस्ते करण्यात आला. जिल्हा परीषद शाळा नंबर ५ शाळेत शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सभापती मानसी आंबेकर, पंचायत समिती सदस्या सौ.दीपाली साळवी, सदस्या सौ.साक्षी चव्हाण, पंचायत समिती सदस्या सौ.रसिका मेस्त्री, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांतकुमार परगे , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, गटप्रवर्तक आदी उपस्थित होते. यावेळी माझं गांव आरोग्य संपन्न गाव अभियान ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविणे बाबत सभापती सौ.मानसी आंबेकर यांनी मौलीक मार्गदर्शन केले. आरोग्य विषयक जनजागृती करून, आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविण्यात यावी, याबाबत सौ.दीपळी साळवी यांनीही मार्गदर्शन केले. तसेच अभियान प्रभातफेरी आयोजित करून जनजागृती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg