loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे रेल्वे स्थानकात अज्ञात चोरट्याने चोरल्या महिलेच्या सोन्याच्या बांगड्या

ठाणे (प्रतिनिधी) - मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व येथील ४३ वर्षीय लतिका चंद्रशेखर मोरे या गृहिणीच्या पर्समधून चार सोन्याच्या बांगड्या ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ एप्रिल रोजी तक्रारदार लतिका चंद्रशेखर मोरे ह्या कुटुंबासह चिपळुण येथे गेल्या होत्या. २० एप्रिल रोजी नेत्रावती एक्सप्रेसने ठाण्यात येथे आल्यानंतर त्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये चढत असताना, झालेल्या गर्दीत त्यांची खांद्यावरील पर्स उघडी असल्याचे लक्षात आले. तपासणी केली असता पर्समधील सोन्याच्या चार बांगड्या गायब असल्याचे दिसून आले. फलाटावर शोध घेतल्यावर सोन्याची चैन मिळून आली, मात्र बांगड्या सापडल्या नाहीत. चोरीस गेलेल्या बांगड्यांची किंमत एक लाख १२ हजार रुपये असल्याचे पोलीस तक्रारीत नोंदविण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg