loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड -मंडणगड मार्गावर अर्धवट पुलाच्या कामामुळे अवकाळी पावसात चिखलाचे साम्राज्य!

खेड( इक्बाल जमादार) - महाड मंडणगड खाडीपट्ट्या मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम मागील चार वर्षापासून चालू आहे. याच रस्त्यावरील चोचिंदे वणि कोंड रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या रस्त्यावर अवकाळी पावसात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अनेक वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र संध्याकाळच्या सुमारास पाहण्यास मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ठिकाणी बाह्य वळण रस्ता तयार करण्यात आला आहे, मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पूर्वी मातीचे साम्राज्य पसरलेले होते त्यातच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर या धुळीचे चिखलात रूपांतर झाले. या चिखलातून मार्ग काढताना अनेक वाहनांना तारेवरची कसरत करावी लागली. अर्धवट पुलाचे बांधकाम पावसाळा चालू होण्यास एक महिन्याचा अवधी शिल्लक असताना झाले नाही तर या ठिकाणावरून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg