loader
Breaking News
Breaking News
Foto

जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम

पनवेल - कष्टकर्‍यांचे द्रष्ट नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार २०२६ स्पर्धा, श्रीमंत योगी’ महानाट्य, त्याचबरोबरीने नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, उरण उपनगराध्यक्ष यांचा सत्कार सोहळा अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची नियोजन बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे नोडमध्ये पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार या वर्षीही देण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या निकषावर सर्वेक्षण करण्यात येत आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ०७ मे रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान येथे होणार्‍या पुण्यतिथी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने श्रीमंत योगी’ महानाट्य, तसेच नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा या आयोजित कार्यक्रमाचा नियोजन आढावा घेण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg