दापोली (प्रतिनिधी) - वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा बांधतिवरे ताडील कोंगळे सुकोंडी रस्ता कोंगळे गावाकडे जाताना ताडील महसुली गावाच्या हद्दीत पूर्णपणे उखडला आहे. डांबरी रस्त्यावर डांबरच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे रस्त्याबाहेर वर आलेली जाडी भरडी खडी सगळीकडे पसरली आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत. ते सुरळीत वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या मार्गाची उपयुक्तता लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक विना अपघात सुरू राहण्यासाठी या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी सुधारणा करण्यात आली नाही तर रस्ता वाहतूक योग्य राहणार नाही परिणामी या मार्गावरील एस.टी. बसेस फेऱ्या तसेच खाजगी वाहतुकही बंद पडण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता अधिक असल्याने त्याचा परिणाम हा वाहतुकीवर होईल असे आजचे स्पष्ट चित्र आहे .
याबाबत ताडील ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर खापरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले जिल्हा परिषदेच्या मालकीचा हा रस्ता असून यासाठी वेळोवेळी संबंधित बांधकाम विभाग अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीव्दारे संपर्क साधून त्यांना लेखी निवेदन देऊनही रस्त्याची सुधारणा अद्यापही झालेली नाही. या रस्त्याची सुधारणा पावसाळ्यापूर्वी करण्यात आली नाही तर या मार्गावरील वाहतूक बंद पडण्याची शक्यता अधिक आहे . ऐन पावसाळ्यात वाहतूक बंद पडलीच तर या मार्गावरील कोंगळे , वाघवे चिखली, तसेच ताडील येथे राहणाऱ्या रहिवाशांची रस्त्याअभावी मोठीच गैरसोय होणार आहे. त्यात प्रामुख्याने सारंग येथील हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या तसेच दापोलीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह दापोलीत दररोज कामावर येणाऱ्या मजुरांची त्याचप्रमाणे बाजारहाट, शासकीय आस्थापनांच्या कार्यालयात कामे करण्यासाठी येणाऱ्यांना मोठयाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कारण या मार्गाला अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने मोठीच आपत्ती ओढवणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या मार्गाची सुधारणा आवश्यक आहे.






































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)


























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.