loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत मध्यरात्री वादळी वाऱ्याचा हाहाकार

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरासह परिसरात गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या वादळाने शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणची पत्र्याची शेड हवेत उडून गेली. सुदैवाने, या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्री झालेल्या या वादळाचा सर्वाधिक फटका रामेश्वर प्लाझा (लेक व्ह्यू हॉटेल) परिसराला बसला. येथील पत्र्याचे मोठे छत वादळी वाऱ्याने उडून थेट श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात पडले. विशेष म्हणजे, नगरपरिषदेने अलीकडेच पत्र्याच्या शेडबाबत ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे छत मोती तलावाच्या समोरील मुख्य रस्त्यावर न कोसळता बाजूला पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वादळी वाऱ्यामुळे मोती तलाव आणि शिव उद्यान परिसरातही मोठी पडझड झाली. तलावाच्या काठावर सध्या फूटपाथचे काम सुरू आहे, त्यामुळे काही अशोकाच्या झाडांची मुळे आधीच सैल झाली होती. ही झाडे नगरपरिषदेजवळ थेट रस्त्यावर कोसळली. रस्ता मोकळा करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ​विद्युत पुरवठा खंडित, जनजीवन विस्कळीत: गुरूवारी सायंकाळपासूनच तालुक्यात विजांचा लखलखाट सुरू होता, तर आंबोली परिसरात पावसाने हजेरी लावली होती. रात्री १२ च्या सुमारास शहरात वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने सुमारे दोन तासांपेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. ​शहरात अन्य काही ठिकाणीही किरकोळ नुकसान झाल्याचे वृत्त असून, महसूल व नगरपरिषद प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg