loader
Breaking News
Breaking News
Foto

कुरंग मधलीवाडी येथे घराचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

लांजा (संजय साळवी) - घर मालकाच्या परवानगीशिवाय घराच्या छपरावरील कौले, लाकडी रिपा, वासे काढून चार लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी झर्ये येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे. श्रीपाद महादेव कदम (५२ वर्षे, सध्या रा. विकास टॉवर, सह्याद्री नगर, मीरा - भाईंदर, जि. ठाणे) यांनी याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली होती. श्रीपाद कदम व साक्षीदार यांचे लांजा तालुक्यातील कुरंग मधलीवाडी येथे सामूहिक मालकीचे घर आहे. सामूहिक मालकीचे आणि छप्पर एक असलेल्या व अंतर्गत विभक्त असलेल्या घराच्या दुरुस्तीचे काम बाळकृष्ण रमेश पांचाळ (रा. झर्ये, ता. राजापूर) यांनी घेतले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर श्रीपाद कदम यांनी बाळकृष्ण पांचाळ यांना माझे सोडून तू इतरांच्या घराच्या छपराच्या दुरुस्तीचे काम कर असे सांगितले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र तरी देखील बाळकृष्ण पांचाळ यांनी बुधवार दि. १५ ते मंगळवार दि. २१ एप्रिल या कालावधीत श्रीपाद कदम व साक्षीदार यांच्या घराच्या छपरावरील कौले, लाकडी रिपा, वासे काढून त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून, अतिक्रमण करून छपरावरील कौले, वासे, रिपा यांची मोडतोड करून तसेच आतील सामानाची नासधूस केली. तसेच ४ लाख रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी श्रीपाद कदम यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी बाळकृष्ण पांचाळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९ (४), ३२४ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. दिनेश आखाडे हे करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg