loader
Breaking News
Breaking News
Foto

आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी आरोग्य कर्मचार्‍यांचा संपात १०० टक्के सहभाग

वरवेली (गणेश किर्वे) - संगमेश्वर तालुक्यात आरोग्य विभाग हिवताप आरोग्य कर्मचारी एकत्रितपणे बेमुदत संपात सहभागी झाले असून दिनांक २१ एप्रिल पासून हा संप सुरू आहे. चौथ्या दिवशी १००% कर्मचारी सहभागी आहेत. या संपाचा आरोग्य यंत्रणेवर दुष्परिणाम होत आहे. गृहभेट, जलजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, हिवताप, डेंग्यू, कॉलरा, कावीळ, अतिसार आजार, उष्माघात उपाय योजना यावर कर्मचारी अभावी गंभीर परिणाम दिसून येत आहेत. हे परिणाम प्रतिबंधासाठी संप लवकरच मिटवण्यात यावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचार्‍यांना लागू करणे, आश्वासित प्रगती योजना १०,२०,३० टप्पे वेळेत कार्यवाही करून कर्मचार्‍यांना लाभ देणे, कंत्राटी कर्मचारी अनेक वर्ष सेवा देत असून त्यांच्या सेवा नियमित करणे, शासनाकडील रिक्त पदे ताबडतोब भरून रिक्त जागांवर कर्मचार्‍यांना काम करण्याकरिता जो ताण पडत आहे तो दूर करणे, आरोग्य कर्मचारी यांचे पदनाम बदली करणेबाबत अशा विविध कर्मचार्‍यांच्या हक्कांसाठी सदरचा बेमुदत संप संगमेश्वर सुरू असून पूर्णपणे कर्मचारी एकत्र लढ्यात उतरल्याचे चित्र आहे. शासनाने लवकरात लवकर कर्मचार्‍यांच्या या मागण्यांमध्ये विचार करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशी मागणी आरोग्य कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg