loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात सुनेने चोरले सासूचे ३ लाखाचे दागिने

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्याच्या मानपाडा परिसरात सुनेनेच आपल्या सासूचे ३ लाख १४ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी करून मैत्रिणीकडे तो ऐवज लपवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

५३ वर्षीय तक्रारदार महिला ठाण्यात घोडबंदर रोड मानपाडा परिसरात रहायला असून त्या गेल्या १० वर्षांपासून कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरात पती, दोन मुले व सुन असे सर्वजण एकत्र वास्तव्यास आहेत. तक्रारदार या सणासुदीला वापरणारे सोन्याचे दागिने घरातील बेडरूममधील बेडमध्ये सुरक्षित ठेवले असताना २१ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी दागिने वापरल्यानंतर नेहमीप्रमाणे बेडमध्ये ठेवले होते. मात्र, ३० मार्च २०२६ रोजी बेड उघडून पाहिले असता दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही.दरम्यान,२१ एप्रिल रोजी त्यांच्या सुनेनेच दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच हे दागिने नवीमुंबई, कोपरखैरणे येथील तिच्या मैत्रिणीकडे ठेवले असल्याचे सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी संबंधित मैत्रिणीच्या घरी जाऊन पाहणी केली असता घर बंद आढळले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये चार तोळ्यांचे सोन्याचे कॉईन, तीन तोळ्यांच्या बांगड्या, दोन तोळ्यांचा हार, झुमके, चेन, अंगठी, लॉकेट व इतर दागिन्यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत ३ लाख १४ हजार रुपये असून सुनेविरोधात तक्रार नोंदवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg