loader
Breaking News
Breaking News
Foto

वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चापोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा २८ व २९ एप्रिल रोजी

लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील वेसुर्ले गावचे ग्रामदैवत श्री देव चापोबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा दिनांक २८ व २९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात येणार असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय सोहळ्यात सर्व वयोगटांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी लहान मुलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, दुपारी महिलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ८ वाजता श्री गणेश वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ, कुर्णे यांची सुमधुर भजन. रात्री ९ वाजता लहान मुलांचे नृत्य सादरीकरण व त्यानंतर लकी ड्रॉ व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक २९/०४/२६ रोजी सकाळी मूर्ती अभिषेक आणि सत्यनाऱायण पूजा असून १२.३० ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ५ वाजता महीलांचा हळदी कुंकू समारंभ, ५.३० ते ६.३० मान्यवरांचा स्वागत समारंभ तर ७.३० ते ८.३० पालखी प्रदक्षिणा (भोवत्या) होतील. रात्री १०.३० वाजता विशेष आकर्षण : अकल्पित’ हे हृदयस्पर्शी दोन अंकी नाटकाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg