loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे सुपुत्र आणि युवामंत्री योगेशदादा कदम यांच्याकडे ठाणे, पालघरची सूत्रे

खेड (इक्बाल जमादार) - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आगामी ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आक्रमक ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात आले असून त्याची जबाबदारी संपर्क मंत्री म्हणून खेड तालुक्याचे सुपुत्र आणि युवा गृहराज्य मंत्री योगेशदादा कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले असून 'संपर्क मंत्री अभियान' हे केवळ अभियान राबविणार आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये संघटन झपाट्याने मजबूत करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक संपर्क मंत्र्यांच्या खांद्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी टाकत 'जिंकाच, अन्यथा पर्याय नाही' असा संदेश उपमुख्यमंत्री यांच्या नंदनवन या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत देण्यात आला. ठाणे आणि पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष होत असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार किसन कथोरे, माजी मंत्री कपिल पाटील हे सक्रिय आहेत. भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविताना शिवसेनेला आव्हान उभे केले आहे. त्यामुळे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन ठाणे, पालघर जिल्ह्यावर भगवा फडकविण्यासाठी सेनेने प्रयत्न सुरू केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कामगिरी पाहता नामदार कदम यांच्यावर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देऊन भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

टाईम्स स्पेशल

या अंतर्गत गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार, उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहमदनगर, योगेश कदम यांच्याकडे ठाणे व पालघर, प्रकाश आबिटकर यांच्याकडे नांदेड व हिंगोली, भरत गोगावले यांच्याकडे बीड, आशिष जयस्वाल यांच्याकडे जालना, प्रताप सरनाईक यांच्याकडे अमरावती व अकोला, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ व वाशिम, संजय शिरसाट यांच्याकडे भंडारा व गोंदिया, प्रतापराव जाधव यांच्याकडे नागपूर ववर्धा, शंभुराज देसाई यांच्याकडे गडचिरोली व चंद्रपूर तसेच दादा भुसे यांच्याकडे धुळे व बुलढाणा या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या २२ जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जिंकत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांवर भगवा फडकवणे हे अंतिम लक्ष्य निश्चित केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg