loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे साखरपा परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी; बागायतदारांची धावपळ

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली कोंडगाव-साखरपा परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. आंबा काजू बागायतदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या चार दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने उष्णतेचा पारा चढला होता. पहाटे देवळे चाफवली भागात पावसाने शिडकावा केला.अशातच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती आणि त्यानुसार अचानक पावसाने जोर धरला. विजांच्या कडकडाटामुळे वातावरण दणाणून गेले होते आणि जोराच्या पावसाने हजेरी लावली. परिसरातील या पावसाने आंबा ,काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

टाईम्स स्पेशल

या पावसामुळे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेला पेंडा तसेच आगोटीसाठी ठेवलेली लाकडे आणि शेण्या पूर्णपणे भिजून गेल्या. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अवकाळी पावसाच्या या अनपेक्षित आगमनामुळे शेतकरी आता शेतीच्या कामांसाठी अधिक सतर्क झाला असून, पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg