loader
Breaking News
Breaking News
Foto

गणित प्राविण्य परीक्षेत रोटरी स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांचे यश

खेड - माहे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य स्पर्धा परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड मधील इयत्ता नववीतील 2 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशाची परंपरा कायम राखली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील गणितीय क्षमतांचा विकास करण्याच्या हेतूने गणित प्राविण्य परीक्षा व गणित प्रज्ञा परीक्षा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. गणित प्राविण्य परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळविलेले विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरतात. गणित प्राविण्य परीक्षेतील इयत्ता 9वीतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. शौर्य गवस, कु. आराध्य मेहता यांचा समावेश आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षेकरिता निवड झाली आहे. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व गणित विषय शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितांचे अभिनंदन करून द्वितीय पातळीवरील प्रज्ञा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg