loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे येथे कंपनीतून अडीच लाखांची वजन मापे लंपास; आयशर ट्रक चालकावर संशयाची सुई

खेड: लोटे एम.आय.डी.सी. येथील नोव्होकेम टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपनीतून सुमारे २ लाख ५४ हजार ९५० रुपये किमतीची लोखंडी वजन मापे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक संजय सितापराव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अमोल आनंद अकुलकर यांनी खेड पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. २५ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत ही चोरी झाली. कंपनीच्या पॅकिंग स्टोअरबाहेर लाकडी पॅलेटवर ठेवलेली २० किलो वजनाची एकूण २२१ षटकोणी वजन मापे अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. यामध्ये सिद्धीविनायक सिस्टम्स आणि अर्पण इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनकडून खरेदी केलेल्या मापांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संशय बळकट झाल्यानंतर फिर्यादीने १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्रायोगिक तत्त्वावर २५ वजन मापे मोजून ठेवली आणि त्यावर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवली. २ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता पाहणी केली असता, त्यातील १० मापे कमी असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सकाळी ८.२० च्या सुमारास कंपनीत आलेल्या एम.एच. ०६ बी.डब्लू. ३०८९ या क्रमांकाच्या आयशर ट्रकचा चालक संजय सितापराव हा ट्रकच्या केबिनमधून उतरून संशयास्पद रित्या वावरताना दिसला. यावरून संबंधित ट्रक चालकानेच स्वतःच्या फायद्यासाठी ही वजन मापे चोरल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. खेड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg