loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात पाचपाखाडी परिसरात ११ तास बत्ती गुल

ठाणे (अमोल पवार) - ठाण्यात ऐन उन्हाळ्याच्या वातावरणात एल टी डिस्ट्रिब्यूटिशन केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे पाचपाखाडी परिसरात शुक्रवारी (ता.२४) रोजी पहाटे पाच वाजता वीज पुरवठा खंडित झाला. सदरचा वीज पुरवठा पूर्वरत होण्यासाठी सायंकाळचे चार वाजणार असल्याची माहिती एम एस ई बी चे सहाय्यक अभियंता राऊत यांनी दिली. एमएसइबीच्या भोंगळ कारभारामुळे उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने एम एस ई बी च्या कारभारविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या उन्हाचा पारा दिवसेदिवस वाढत आहे. तंत्रज्ञ अद्ययावत असताना एस एस इ बी ला कंत्राटदार एजन्सीवर अवलंबून राहावे लागत असल्याची माहिती समोर आली. शुक्रवारी पहाटे एल टी डिस्ट्रिब्यूटिशन केबल फॉल्ट झाला अन् ठाण्यात पाचपाखाडी परिसरात बत्ती गुल झाली. एसएसइ बीने मे.जी आर पल्ले आणि मे.ओम साई या दोन एजन्सीची नेमणूक केली आहे त्यांच्या मार्फत लेबर पुरवठा आणि केबल फॉल्ट शोधण्यासाठी मशीन घटनास्थळी पाठविण्यात येते. ह्या दोन्ही एजन्सी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत काम करतात. रात्री १० नंतर ते. सकाळी ७ पूर्वी केबल फॉल्ट शोधण्यासाठी मशीन आणि लेबर उपलब्ध होत नसल्याने एमएसईबीला महत्वाच्या केबल फॉल्टची कामे वेळेत करता येत नाही.शुक्रवारी. पहाटे वीज गेली आणि कंत्राटदार कामगार सकाळी ९ नंतर पोहोचले. आणि मशिनद्वारे फॉल्ट शोधायचे काम सुरू झाले दुपारचे अडीच वाजले तरीही त्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यांत यश आले नाही शुक्रवारी पहाटे पाच वाजता गेलेली वीज १० ते ११ तास एम एस ई बी ला पूर्वरत करण्यास वेळ लागणार असल्याने स्थानिक नागरिक वयोवृद्ध, आदींनी संताप व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg