loader
Breaking News
Breaking News
Foto

अजितदादांच्या दौऱ्याआधी 'त्या' मैदानावर ‘अघोरी पूजा’? अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा ‘अघोरी पूजा’ प्रकरणावर ट्विट करत नवा दावा केला आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या एआय (AI) इमारतीजवळ 28 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री अघोरी पूजा मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी ही पूजा करण्यात आली, त्याच ठिकाणी दुसऱ्याच दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणीसाठी येणार होते. त्यामुळे या घटनेभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अघोरी पूजेबाबत मिटकरी यांचे हे सलग दुसरे ट्विट आहे. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारचा दावा करत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. या नव्या ट्विटनंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. या दाव्यामुळे बारामती आणि राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या दौऱ्याशी ही घटना जोडली गेल्याने विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत अजूनपर्यंत प्रशासन किंवा अजित पवार यांच्या कुटुंबकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, अघोरी पूजा प्रत्यक्षात झाली का, याबाबत कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg