देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे, चाफवली, मेघी या पंचक्रोशी मध्ये ढगांच्या गडगडाट व विजेच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे आंबा काजू शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आंबा सीजन सुरू होण्यापूर्वीच पाऊस आला त्याने शेतकरी मोठ्या चिंतेत पडला आहे. यावर्षी निसर्गाने आंबा काजूला मोहर चांगला दिला होता परंतु काही दिवसातच उष्णता भयानक वाढल्याने आंबा काजूचा मोहर करपला काळा पडला. त्यामुळे आंबा काजूचे उत्पन्न मुळातच कमी असताना आता त्यातच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच आज पाऊस पडल्याने आंबा काजूचे उरले सुरले उत्पन्नही सपाट होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.
महागडी खते, साफसफाई, महागड्या फवारण्या, राखणदार या सर्वांचा विचार करता आंबा काजू बागायतदारांच्या हातात आता पाऊस उत्पन्न ठेवतो की नाही या भीतीने शेतकऱ्यांची गाळण उडाली आहे. सुमारे एक तास पडलेल्या पावसाने आंबा काजूला मोठा फटका पडणार असून अगोदर पासूनच यावर्षी उत्पन्न कमी आले असल्याची बोंबाबोंब असताना त्यातच पावसाने हजेरी लावल्याने आंबा काजू बागायतदार व व्यापारी वर्ग चिंतेत पडला असून केलेल्या खर्चाचा ताळेबंद कसा बसवावा या विचारात आत्ताच पडला आहे. अति उष्णता आणि आता पडलेला पाऊस हे एकूणच कोकणातील शेतकऱ्यांच्या आंबा काजू पिकावर निसर्गाने केलेली अवकृपाच म्हणावी की काय, असा प्रश्न शेतकरी वर्गात पडला आहे.
















































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.