loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

केळंबे-लांजा (सिराज  नेवरेकर) - लांजात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी 2.45 वाजता पावसाने सुरूवात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वाचीच तारांबळ उडाली. सर्वत्र रामनवमीचा उत्सव उत्साहात सुरु असताना अवकाळी पावसामुळे सावटाचे चित्र निर्माण झाले. कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरीकांना थोडा गारवा मिळाला. असला तरी आंबा काजू बागायतदार यांचे मोठे नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. लांजा शहरांत गारांचा पाऊस पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज सकाळपासून मळभाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिशय उष्मा वाढला होता. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत होती. उष्म्याचे वाढलेले प्रमाण यामुळे अवकाळी पाऊस येणार अशी अटकळ बांधली जात होती. अखेर 2.45 वाजता अवकाळी पावसाने विजाच्या जोरदार आवाजात पडायला सुरूवात केली. त्यामुळे बाजारातील व्यापारीसह सर्व नागरीकांची धावपळ झाली. हातातोंडाशी आलेले आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे.

टाइम्स स्पेशल

आधीच निसर्गाच्या अवलक्षणीय बदलामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी बागायतदार यांच्यावर आता आस्माणी संकट आल्याचे बोलले जात आहे. सर्वत्र रामनवमीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना पावसानेही हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. सुरूवातीला जोरदार पावसाने सुरूवात केली. मोठा पाऊस कोसळणार असे वातावरण तयार झाले होते. तालुक्यातील बेनी, वेरवली, खेरवसे आदी गावात जोरदार पाऊस कोसळला. लांजा शहरात अर्धा तास गारांचा पाऊस पडला. मात्र त्यानंतर पाऊस थांबला आणि कडक ऊन पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg