loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत दापोली नगरपंचायतीला आधुनिक सक्शन युनिट वाहनाचे लोकार्पण

दापोली (चंद्रशेखर जोशी) : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत दापोली नगरपंचायतीला आधुनिक सक्शन युनिट या वाहनाचा लोकार्पण सोहळा श्रेयाताई कदम यांच्या हस्ते करण्यात आला. दापोली शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्याच्या दिशेने हे वाहन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी यामुळे मोठी मदत होणार असून, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यास याचा निश्चितच हातभार लागेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वच्छतेचा संकल्प केवळ शासनाचा नसून प्रत्येक नागरिकाचा आहे. शासनाच्या योजना आणि नागरिकांचा सहभाग यांची सांगड घातल्यासच ‘स्वच्छ दापोली, सुंदर दापोली’ हे स्वप्न साकार होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग यांचेसह शिवसेनेच्या नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg