loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण शहरातील दागिने चोरी प्रकरणी अटक केलेल्या संशयितांना पोलीस कोठडी

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयावरुन दाखल गुन्ह्याचे तपासाकरीता अटक करण्यात आलेल्या संशयीत अमृता अमर म्हापणकर राहणार कुंभारमाठ ता. मालवण व राघो सूर्यकांत राऊत राहणार सुकळवाड ता. मालवण यांना मालवण न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. नितीन कुंटे यांनी बाजू मांडली तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व सोनाली कुबल यांनी सरकार पक्षास सहाय्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि. १७ जानेवारी २०२६ रोजी मालवण येथील समर्थ कृपा संकुलातील फिर्यादी महिलेच्या राहत्या घरातील मंगळसुत्रासहित सोन्याचे दागिने कपाटातून नाहीसे झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीच्या घरात आलेल्या संशयीतांविरूद्ध फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात दागिने चोरल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम ३०५ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याकामी मालवण पोलीसांचा तपास सुरु असताना संशयीत अमृता अमर म्हापणकर राह. कुंभारमाठ ता. मालवण व राघो सूर्यकांत राऊत राह. सुकळवाड ता. मालवण यांनी ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मालवण पोलीसांनी या दोन्ही संशयीताना ताब्यात घेतले होते.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, मालवण पोलिसांनी दि. २५ मार्च २०२६ रोजी अमृता अमर म्हापणकर व राघो सूर्यकांत राऊत या संशयितांना मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांही संशयिताना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या बाबत मालवण पोलिस ठाण्याचे स.पो.नि. खाडे हे अधिक तपास करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg