loader
Breaking News
Breaking News
Foto

गजाली रंगल्या, भुवया उंचावल्या!' आयनॉक्समध्ये नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी एकत्र पाहिला 'गोदान'; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई (प्रतिनिधी) - राजकारणाच्या धकाधकीच्या मैदानात एकमेकांचे खंबीर साथीदार असलेले दोन दिग्गज नेते जेव्हा एकत्र वेळ घालवतात, तेव्हा केवळ चित्रपटच रंगत नाही, तर राजकीय चर्चांनाही नवी धार चढते. नुकतेच मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आयनॉक्स थिएटरमध्ये एकत्र बसून 'गोदान' हा चित्रपट पाहिला. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेल्या 'गजाली' पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या आणि राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नेहमी विधानसभेत किंवा जाहीर सभांमध्ये विरोधकांवर तुटून पडणारे हे दोन नेते अत्यंत निवांत क्षणी एकत्र पाहायला मिळाले. रवींद्र चव्हाण आणि आमच्यात यांच्यात काही वाद लावून देणारे आहेत अशी टीका राणे यांनी केली होती. मुन्शी प्रेमचंद यांच्या अजरामर साहित्यावर आधारित 'गोदान' चित्रपट पाहताना दोघांमध्येही जिव्हाळ्याच्या गप्पा रंगल्या होत्या. आयनॉक्समधील या भेटीत केवळ चित्रपटाचा आनंदच घेतला गेला नाही, तर त्यांच्यातील संवाद आणि देहबोलीतून एक वेगळाच राजकीय संदेश गेल्याचे बोलले जात आहे. रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे हे दोन्ही नेते भाजपच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ असून, त्यांच्यात असलेले सख्य या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांऐवजी थेट चित्रपटगृहात अशा प्रकारे एकत्र दिसल्यामुळे या दोघांमधील समन्वय आणि मैत्रीची चर्चा आता घराघरात पोहोचली आहे. या 'गोदान' दर्शनाने कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील अंतर्गत वादाच्या वावड्या उठवणाऱ्या विरोधकांसाठी हे चित्र म्हणजे एक मोठी चपराक मानली जात आहे. 'आमच्यात कोणताही वाद नसून आम्ही एकत्र आहोत' हे सांगण्यासाठी या नेत्यांना कोणत्याही पत्रकार परिषदेची गरज भासली नाही; त्यांची ही एकत्र उपस्थितीच विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी पुरेशी ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg