loader
Breaking News
Breaking News
Foto

हातिवले टोलविरोधात राजापूर तालुका एकवटला

राजापूर - मुंबई –गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील हातिवले टोल सुरू करण्याच्या हालचालींमुळे राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक व शेतकरी एकत्र आले. स्थानिक नागरिकांना संपूर्ण टोल माफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण, निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी अपघात होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. भू-संपादन मोबदला, सर्विस रोड, स्ट्रीट लाईट, बस स्टॉप, सुरक्षा सुविधा यांसह अनेक कामे प्रलंबित असताना टोल वसुली सुरू करू नये, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. यापूर्वीही स्थानिकांच्या आंदोलनामुळे व निलेश राणे यांच्या पुढाकाराने टोल बंद झाला होता. पुन्हा टोल सुरू करण्याच्या हालचालींमुळे राजापूर तालुक्यात आंदोलनाची तयारी सुरू झाली असून टोल प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg