दापोली (प्रतिनिधी) - बाळा जो जो रे, कुलभूषणा । दशरथ नंदना.... अशाप्रकारे संजना दुबळे, भुमिका भुवड, श्रुती दुबळे, प्रियांका दुबळे आणि श्रावणी दुबळे या सुहासीनींनी आपल्या सुहास्य वदनाने गायलेल्या पाळणा गिताने श्रीराम जन्मोत्सव सोहळयातील वातावरणच पुर्णपणे भारावून गेले होते. हे सर्व घडून आले गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिरात. त्यावेळी श्रीराम मंदिर आणि मंदिर सभोवतालील परिसरात उपस्थित असलेला श्रीराम प्रभूंचा भक्तगण श्रीरामांच्या भक्ती रसाने न्हाऊन निघालेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते.
दापोली तालूक्यातील गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिरात सन १९४८ पासून कोरोना संक्रमणाचा काळ वगळता श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याची येथील ग्रामस्थांची सुरू असलेली अखंडित परंपरा आजही त्याच भावनेने आणि भक्तीभावाने तशीच सुरू आहे. हेच येथील ग्रामस्थांचे मोठे यश आहे. अशा येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी गुढी पाडव्यापासूनच विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात. तसे यावर्षीही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांमधील आज गुरुवारी २६ मार्च २०२६ रोजी या मंदिरात संपन्न झालेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
श्रीराम जन्मोत्सवाचे किर्तन सुप्रसिध्द किर्तनकार कर्वे बुवा यांनी आपल्या सृश्राव्य वाणीतून सादर केले. जन्म सोहळयाचे किर्तन पार पडताच फटाक्याची आतषबाजी केली गेली. ढोल तासे सनई चौघडयांच्या निनादात संपूर्ण परिसर दणाणून गेले. त्यानंतर येथील सुहासिनीनी आपल्या सुहास्य वदनांने पाळणा गित गायले, त्यावेळी उपस्थित भक्तगण मंगलमय वातावरणाने पूर्णतः भारावून गेले. श्रीराम जन्मोत्सव सोहळयाला गिम्हवणे या गावासह तालुक्यातील अबाल वृध्द स्त्री पुरूष भक्त गणांनी केलेली मोठी गर्दी ही प्रभू रामचंद्राच्या भक्तीची साक्षच देत होती. अतिशय शिस्तबध्द आणि नेटके नियोजन करण्याची येथील गिम्हवणे दुबळेवाडी ग्रामस्थांची परंपरा ही जूनीच आहे. अशा या उत्साही पंरपरेने उपस्थितांचा उत्साह चांगलाच व्दिगुणीत झाला.

















































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.