loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्ले रायगडला जायचं प्लॅन करताय “या” दोन दिवशी पायरी मार्ग असणार बंद

संगलट (खेड )(प्रतिनिधी) - दरवर्षीप्रमाणे सहा जून व तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा रायगड वर साजरा केला जातो. या वेळेला मोठ्या प्रमाणावर पायरी मार्गाने जाणारी गर्दी पाहता किल्ल्यावरून येणारे मोकळ्या दगडांमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता ३० व ३१ मे या दोन दिवशी पायरी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने काढला आहे. किल्ले रायगडावर ६ जून रोजी तारखेनुसार व २७ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त व पर्यटक रायगडावर येत असतात. किल्ले रायगड येथे असणाऱ्या तटबंदीच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर दगडाखालची माती सरकल्याने पावसाळ्यात दगड येऊन शिवभक्त व पर्यटक जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या वेळी महादरवाज्याच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरून पडलेल्या दगडामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावर्षीच्या सोहळ्याच्या अगोदर सदर ठिकाणाहून उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे. सदर कड्यावरील मोकळे दगड व दरड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने काढण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी सहमती दर्शवली असून त्यासाठी दिनांक ३० मे व ३१ मे रोजी किल्ले रायगडावर मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान पायी मार्गाने गड चढ उतार करणाऱ्या व्यक्तींना हानी पोहोचू नये म्हणून या कालावधीमध्ये किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायी मार्गाची वाटचाल पूर्ण बंद करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

किल्ले रायगडावर तन्या उतरण्यासाठीच्या पायी मार्गावरील वाटचाल ३० मे व ३१ मे या दोन दिवसांसाठी पूर्ण बंद करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले असून निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संदेश शिर्के यांनी या संदर्भातले परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार चित्तदरवाजा, नाणे दरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर (होळीचा माळ) येथे पाई मार्गावरील जाण्या येण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आवश्यक पोलीस बंदोबस्त लावावा, या कालावधीत रायगड रोप-वे सुरू राहणार असल्याचे त्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg