loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीरात शाहीर काशिराम जाधव यांचा कार्यक्रम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व समाधान शिबिर शासकीय योजनांचा लाभ थेट सर्व सामान्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आल्याने कोरले गावचे सुप्रसीद्ध शाहीर काशिराम जाधव यांनी लांजा तालुक्यातील कोरले पुनस या गावी व कोल्हापूर येथे शिबिरामध्ये उपस्थित राहुन स्वागतगिता बरोबर अभियान पुरक गिते सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लांजाच्या तहसीलदार प्रियांका ढोले, नायब तहसिलदार अनिल गोसावी यांनी शाहीर जाधव यांना सप्रेम भेट देऊन त्यांचा गौरव केला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्याचे तहसिलदार सुशीलकुमार बेल्हे, नायब तहसिलदार चव्हाण यांनी टोपसंभापूर, लाटवडे, पेठवडगाव, हातकणंगले याठिकाणी शाहीर जाधव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी जाधव यांनी उपस्थितांचा उत्साह वाढविला.

टाईम्स स्पेशल

ही महाराष्ट्राची धरणी गाते मंगलमय गाणी थोर शिवबाची करणी, माझ्या राजाचा आदर्श गोजतोय आज जगामध्ये त्रिभुवनी.... या स्वरचीत गिताने सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमप्रसंगी कोल्हापूरवसीयांनी व तहसीलदार सुशिलकुमार बेल्हे यांनी जाधव यांचा गौरव केला. कार्यक्रमाला धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, महसुल विभाग, जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg