loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लबचे सदस्य विवेक कदम यांच्याकडून निराधारांना आधार

खेड (प्रतिनिधी) - लायन्स क्लब चा स्तुत्य उपक्रम निराधारांना आधार २१ मे २०२६ रोजी लायन्स क्लबचे सदस्य विवेक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त बिजघर मावळत वाडी येथील कै.महेश खोपकर यांचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांचे पश्चात त्यांची पाच वर्षाची मुलगी, बारा वर्षाचा मुलगा व पंधरा वर्षाची मुलगी आहे तसेच वयोवृद्ध आई-वडील आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कुटुंबाला आधार म्हणून लायन्स क्लबच्या प्रथेप्रमाणे वाढदिवस हॉटेल्समध्ये साजरा न करता अशा कुटुंबांना भेट स्वरूपात जिन्नस देण्याचा कार्यक्रम असतो. त्यानिमित्त आज या परिवाराची प्रत्यक्ष भेट घेऊन या वस्तू त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या व या लहान मुलांना नवीन ड्रेस भेट म्हणून देण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, लायन उत्तम कांबळे, लायन विवेक कदम आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg