मुंबई (ज्ञानेश्वर रावराणे) - सिंधुदुर्ग किनारपट्टीवर देशातील पहिले कृत्रिम 'अंडरवॉटर म्युझियम' (पाण्याखालील संग्रहालय) आकारास येत असून, पर्यटकांना समुद्राच्या तळाशी नेऊन हा अद्भुत नजारा दाखवण्यासाठी अमेरिकेतून खास २६ आसनी पर्यटन पाणबुडी आणण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नौदलाचे निवृत्त झालेले 'आयएनएस गुलदार' हे जहाज नुकतेच समुद्रात बुडवून या प्रकल्पाची यशस्वी पायाभरणी केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील पाण्याखालील पर्यटन केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे.
'ट्रायटन डीप व्ह्यू २४' या नावाने ओळखली जाणारी ही पारदर्शक काचेची आणि बॅटरीवर चालणारी अत्याधुनिक पाणबुडी आहे. डिसेंबर २०२७ पासून या पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्राच्या २२ मीटर खोलवर नेले जाईल. एका वेळी २४ पर्यटक आणि २ कर्मचारी यातून प्रवास करू शकतील. पाणबुडी दाखल झाल्यानंतर पर्यटकांना आधी स्पीडबोटने समुद्रात १२ नॉटिकल मैल आत नेले जाईल आणि तेथून पुढे पाणबुडीच्या साहाय्याने समुद्राच्या तळाशी जहाजाची पाहणी करण्यासाठी नेण्यात येईल. या पाणबुडीसाठी सुमारे ११२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत ही पाणबुडी दाखल होत नाही, तोपर्यंत तारकर्ली येथील राज्य शासनाच्या स्कुबा डायव्हिंग इन्स्टिट्यूटच्या मदतीने प्रशिक्षित आणि मार्गदर्शक स्कुबा डायव्हर्स या पाण्याखालील जहाजाची पाहणी करू शकतील. या नव्या आकर्षणामध्ये पर्यटकांसाठी अनेक थरारक अनुभव उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये मार्गदर्शकासोबत 'रेक डायव्हिंग' (बुडालेल्या जहाजाची पाहणी), १२ मीटरपर्यंत नवशिक्यांसाठी परिचयात्मक स्कुबा डायव्हिंग, १८ मीटरपर्यंत प्रमाणित डायव्हिंग तसेच अंडरवॉटर फोटोग्राफी आणि सागरी शिक्षण व संशोधन कार्यक्रमांचाही समावेश असणार आहे.












































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.