loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे गवळवाडी, खेड येथील विनयभंग आरोपातून निर्दोष मुक्तता

खेड (प्रतिनिधी) - भरणे गवळवाडी तालुका खेड येथे वहिनीने दीर आणि पुतण्या यांच्यावरती मालमत्तेच्या सुरू असलेल्या जुन्या वादावरून विनयभंग तसेच शिवीगाळ, मारहाण, अशा प्रकारचे गंभीर आरोप लावलेले होते. खेड येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश निरगुडे यांनी दोन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे अ‍ॅड. संगिता विजय बापट व ॲड. प्रितेश संदेश जाधव यांनी कामकाज पाहिले. सदर फिर्याद खेड पोलिस स्टेशन उपनिरीक्षक केंद्रे यांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, 76, 79, 131 वगैरे अन्वये गुन्हा नोंदविला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार व फिर्यादी यांच्या तपासणीमध्ये विसंगती आढळल्यामुळे, फिर्याद देणेस झालेला विलंब आणि ॲड. संगिता बापट व ॲड प्रितेश जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून फिर्यादी यांनी दाखल केलेल्या या गंभीर गुन्ह्यातून मा. जिल्हा न्यायाधीश यांनी दिर संजय घोले व पुतण्या विश्वतेज घोले यांची निर्दोष मुक्तता केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg