loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात, रिक्षा चालक गंभीर जखमी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गवरील आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ रिक्षाचा भीषण अपघात झाला असून अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुरेश शामराव साळोखे वय ६६ रा. कोल्हापूर हे आपल्या ताब्यातील रिक्षा क्र. एम. एच. ०९ इ एल २६०८ कोल्हापूर ते गणपतीपुळे जात असताना आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ आली असता आज पहाटे ४ ते ५ या वेळेत रिक्षाचा भीषण अपघात झाल्याचे समजते. मात्र हा अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र अज्ञात वाहनाची धडक बसून हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाजात वर्तविण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा अपघात एवढा भीषण होता कि रिक्षा चालक रिक्षाखाली होता. रिक्षा पूर्णपणे पेढ्याच्या बॉक्सनी भरलेली होती. तो गणपतीपुळे येथे दुकानदारांना माल देण्यासाठी जात असल्याचे समजते. अपघाताचे वृत्त समजताच साखरपा दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रिक्षा चालकाला सहकाऱ्यांच्या मदतीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. साखरपा पोलीस पंचनामा करून या अपघाताचा तपास करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg